Raj Thackarey
रेल्वे व मुंबई महानगरपालिकेने काय काम केलं ते आज सिद्ध होतंय – राज ठाकरे
‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ स्थानका जवळील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या ढिसाळ कामकाजावर व सरकारवर टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या घटनेबद्दल ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळ झालेली घटना दुर्देवी आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपघातग्रस्तांचा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दुखत सामील होत आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे टिवट राज ठाकरे यांनी केले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चेंगराचेंगरी व जुलै २०१८ मधील अंधेरी येथे कोसळलेला पादचारी पूल या दोन घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढला होता, त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी आम्ही मुंबईतील सर्व पुलांचे ऑडिट करू असे आम्हाला आश्वासन दिले होते. रेल्वे व मुंबई महानगरपालिकेने काय काम केले ते आज सिद्ध होतय.”
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्यामुळे आता सर्व विरोधक सत्ताधारी शिवसेना व भाजप यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
#MumbaiBridgeCollapse pic.twitter.com/3HBJNooJST
— Raj Thackeray (@RajThackeray) March 14, 2019
