राज्यातील अनेक भागात आजही पाऊस; वातावरणही ढगाळ
राज्याच्या अनेक भागात आजही पाऊस पडत असून वातावरण ढगाळ आहे. पालघर जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरु आहे. सकाळपासून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. ऐन थंडीच्या दिवसांत कालपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस होत असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जिह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहराने कळवल् आहे.
धुळे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे आणि हवेतल्या गारठ्यामुळे थंडी वाढली आहे.
जालना जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून हवेत गारवा आहे
बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रीच्या सुमाराला जळगाव जामोद संग्रामपूर परिसरात काही ठिकाणी पाऊस पडला. आज सकाळपासून संपूर्ण जिल्हाभरात ढगाळ वातावरण आहे. काल रात्रीच्या पावसामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला असून आज ढगाळ वातावरण असून दिवसाही थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे वापरुन फिरतांना दिसले
औरंगाबाद जिल्ह्यातही सर्वत्र ढगाळ वातावरण असून शहरातल्या सिडको परिसरात आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
