मध्य, हार्बर मार्गावर उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक
मुंबई: मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर दुरुस्ती कामांसाठी उद्या सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर आणि कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल, त्यामुळे लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
मध्य रेल्वे मार्ग
ठाणे ते कल्याण ते दिवा डाऊन धीम्या मार्गावरील मेगाब्लॉकमुळे सकाळी १०.४७ पासून दुपारी ३.५० पर्यंत मुलुंडहून सुटणाऱ्या धीम्या आणि सेमी फास्ट लोकल सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील.
सकाळी १०.३७ पासून दुपारी ०३.०६ पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या जलद आणि सेमी फास्ट लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबतील. या ब्लॉकदरम्यान कल्याण स्थानकातून कसाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पादचारी पूल तोडण्याचे काम केले जाणार आहे.
हार्बर मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, वाशी दोन्ही मार्गावर उद्या सकाळी १०.२१ पासून ते दुपारी ४ पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.
