रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी रेल्वेचा ‘१३९’ हा एकत्रित हेल्पलाईन क्रमांक सुरु
रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं रेल्वेन ‘१३९’ या एकाच क्रमांकात एकत्रीकरण केलं आहे.
सध्याच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांच्या जागी ‘१३९’ हा नवा क्रमांक कार्यरत होईल. प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं सोयीचं होईल आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्याही गरजांसाठी ते रेल्वेशी संपर्क साधू शकतील.
या क्रमांकावर १२ भाषातून माहिती उपलब्ध असेल. कोणत्याही मोबाईल फोनवरून या क्रमांकावर फोन करता येणार असल्यानं सर्व मोबाईल धारकांना त्याचा वापर करणं शक्य होणार आहे.
(सौजन्य – AIR)
