“‘निर्मल गणेशोत्सव’ स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे” – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील
उरण, दि.२८(विठ्ठल ममताबादे): गणेशोत्सवात सामाजिक जाणीव जागृतीची व प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टीने कोविड काळात नियम पाळून सामाजिक भावनेने रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत “निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे ” आयोजन दि. ९ सप्टेंबर २०२१ ते २१ सप्टेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरांवरील नागरिकांनी मोठया प्रमाणवर सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
या स्पर्धेचा उद्देश हा पर्यावरण रक्षण ,निसर्ग संवर्धन , परिसर स्वच्छता व आरोग्याप्रती चांगल्या सवयी लावून गावपातळीवर जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन निर्मल वातावरणात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करणे, हा आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेण्याकरिता http://bit.ly/raigadganesh या गुगल लिंकवर दि.२१ सप्टेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता सर्व स्पर्धकांनी नियम व अटींच्या अधीन राहून ऑनलाईन नोंदणी करावी.
या स्पर्धेकरिता पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसविणाऱ्या सार्वजनिक मंडळे, विविध सामाजिक संस्था तसेच मंडळाचा गणपती नसल्यास गावात घरगुती पातळीवरील गणपती उत्सवात सहभागी होऊन या स्पर्धेत मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागाकरिता गणेश पूजनाचे दैनंदिन निर्माल्य गोळा करून ते निर्माल्य कलश, पोते, गोणी यात संकलन करावे व त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कंपोस्टिंगसाठी पाठविणे/सेंद्रीय खत यासाठी वापरणे, गणपतींच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे आरास, मखर, पूजेतील प्लास्टिक वेष्टन असलेले साहित्य गोळा करून ग्रामपंचायतीच्या संकलन केंद्रात जमा करणे, पर्यावरण पूरक शाडूच्या मूर्तीचा वापर, मूर्ती विर्सजनाकरिता बनविलेल्या कृत्रिम तलावाचा वापर इत्यादी पर्यावरणपूरक विविध जनजागृतीपर उपक्रम स्लोगन, पोस्टर, बॅनर,जिंगल्स, व्हिडिओ, भजन यांच्या माध्यमातून राबवावयाचे आहेत.
संपूर्ण जिल्हयातून प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक जिल्हा स्तरावरून निवडून त्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरावरील नागरिकांनी निर्मल गणेशोत्सव स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी होऊन आपला गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यास हातभार लावावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.
स्पर्धा उद्देश
Ø निर्मल वातावरणात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करणे.
Ø परिसर स्वच्छता व आरोग्याप्रति सवयीसाठी लोकसहभाग वाढविणे.
Ø गाव पातळीवरील विविध मंडळींना सामाजिक उपक्रमासाठी प्रोत्साहित करणे.
Ø पर्यावरणपूरक सण, उत्सव, सभारंभ साजरे करण्यासाठी स्पर्धेमध्ये ग्रामीण युवक, भजनी मंडळ, क्रीडा मंडळ, गणशोत्सव मंडळ, विविध सामाजिक संस्था, ग्रामपंचायती इ. चा सहभाग घेणे.
सदर स्पर्धेतअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम खालीलप्रमाणे
पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवणाऱ्या सार्वजनिक मंडळे, विविध सामाजिक संस्था तसेच मंडळाचा गणपती नसल्यास गावात घरगुती पातळीवरील गणपती उत्सवात सहभागी होऊन या स्पर्धेत मंडळे सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेत सहभागाकरिता गणेश पूजनाचे दैनंदिन निर्माल्य गोळा करून ते निर्माल्य कलश, पोते, गोणी यात संकलन करावे व त्याचे योग्य व्यवस्थापन करणेसाठी कंपोस्टिंगकरणे/सेंद्रीय खत यासाठी वापरावे.
तसेच गणपतींच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे आरास, मखर, पूजेतील प्लास्टिक वेष्टन असलेले साहित्य गोळा करून ग्रामपंचायतीमधील संकलन केंद्रात जमा करणे अथवा मंडळाव्दारे त्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
पर्यावरण पूरक शाडूच्या मूतींचा वापर,तसेच मूर्ती विर्सजनाकरिता बनवलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करणे.
पाणी व स्वच्छता बाबत स्लोगन, पोस्टर, बॅनर, प्लॅस्टिक बंदी, जिंगल्स, व्हिडिओ, भजन आदीव्दारे जनजागृतीपर उपक्रम राबवावेत.
श्रमदानातून परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, कंपोस्ट खड्डे/शोषखड्डे निर्मिती इ. नावीन्यपूर्ण उपक्रम
राबविणे.
सदर स्पर्धेमध्ये सहभागी मंडळानी केलेल्या विविध उपक्रमांबाबत ग्रामपंचायतींकडून दाखला घेण्यात यावा.
तसेच स्पर्धक म्हणून ग्रामपंचायत सहभागी असल्यास सदरचा दाखला पंचायत समितीकडून घेण्यात यावा.
स्पर्धेचे नियम व अटी
🎯सदर स्पर्धेत जिल्हयांतील सर्व ग्रामपंचायती सहभागी होऊ शकतात.
🎯एक गावातून/ग्रामपंचायतीमधून किमान 3 मंडळ सहभागी होऊ शकतील.
🎯सदर सहभाग घेतलेल्या मंडळांनी गुगल फॉर्ममध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर गुगल फॉर्ममध्ये फोटो व व्हिडिओ अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच सदरील फोटो व व्हिडीओ स्पष्ट असावेत.
🎯सहभागी स्पर्धकांनी गुगल फॉर्म मधील माहिती भरताना त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी व इतर
माहिती अचूक नोंदणी करणे आवश्यक आहे.
🎯स्पर्धेतून संपूर्ण जिल्हयांतून प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक जिल्हास्तरावरून निवडून त्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
🎯सदर स्पर्धेच्या पुरस्काराकरिता निवडलेल्या समितीचा निर्णय अंतिम व स्पर्धकांना बंधनकारक राहिल.
🎯मूल्यमापनाच्या कोणत्याही टप्प्यांवर, नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास, कोणतीही पूर्व सूचना न देता स्पर्धकाला या प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
स्पर्धेसंबंधी अधिक माहिती व IEC साहित्यासाठी खालील व्यक्तींशी सम्पर्क करावा.
सुरेश पाटील,
माहिती शिक्षण, संवाद तज्ञ, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, राजिप
(संपर्क क्रमांक-9881712585)
नेहा थळे, माहिती शिक्षण संवाद व समानता सल्लागार संपर्क- 8888875024
स्पर्धा समन्वयक व तांत्रिक समन्वयक
जयवंत गायकवाड जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – संपर्क 9422495846
राजेंद्र दत्तात्रेय अंबिके
उपशिक्षक, जि.प. शाळा नेणवली, ता. सुधागड
(संपर्क क्रमांक–9326636080)
समीर रब्बानी काजी सय्यद, उपशिक्षक, राजिप शाळा आरावी उर्दू , ता. श्रीवर्धन
(संपर्क क्रमांक–8983790197)
