Anil-Ambani-n-Rahul-G-WEB
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
राफेल करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांचे मध्यस्थ म्हणून काम केले आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहीजे अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद केली आहे.
फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदीची घोषणा करण्याच्या 15 दिवस आधी अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आज वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे. आणि या वृत्ताच्या आधारावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.
राफेल कराराची घोषणा करण्याआधीच अनिल अंबानी हे फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना का भेटले?
राफेल कराराबाबतची माहिती अनिल अंबानीना कशी काय मिळाली? याबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिलेच पाहिजेत असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.
राफेल करारासंदर्भात संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि एचएएला देखील या कराराची माहिती नव्हती. मात्र, अनिल अंबानी यांना कराराच्या १० दिवसांपूर्वीच सर्व माहिती होती. अनिल अंबानी यांना मोदी यांनी राफेल कराराबाबत सर्व माहिती आधीच दिली होती. मोदींनी गोपनीयतेचे उल्लंघन केले असून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राहुल यांनी पत्रकार परिषद केली.
By leaking information on the RAFALE MOU in advance to Anil Ambani, the PM has broken the Official Secrets Act and compromised National Security, opening himself up to criminal prosecution.
Please WATCH & SHARE this video with highlights from my press conference today. pic.twitter.com/jb1pcQkqXY
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 12, 2019
फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याच्या घोषणेच्या १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जाँ-येवेस ली ड्रायन यांच्या पॅरिसमधील कार्यालयात जाऊन तेथील उच्चपदस्थ सल्लागारांशी त्यांनी भेट घेतली. अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांचे उद्योग सल्लागार ख्रिस्तोफ सालोमन यांनी एका युरोपीय संरक्षण कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला दिली. या भेटीचा दाखलाही राहुल गांधी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
