“कमलछाप चौकीदार ही चोर है, न्याय हा होणारंच” : राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर पुनः एकवार टीका
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतकेच ‘चौकीदार’ या शब्दाच्या प्रेमात पडलेले दिसतात. आजच सर्वोच्च न्यायालयात त्यांनी आपल्या ‘चौकीदार चोर है’ या आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आणि हे वादळ आता एकदाचं शमणार असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांनी काहि तासात एक नवीन ट्विट केले आहे.
या ट्विट मध्ये राहुल गांधी म्हणालेत की,”२३ मे ला जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊनच राहणार की ‘कमलछाप चौकीदरही चोर है’. न्याय हा होणारंच. गरिबांना लुटून श्रीमंत मित्रांना लाभ करून देणाऱ्या चौकीदाराला शिक्षा ही मिळणारच”. या ट्विटवर भाजप काय प्रतिक्रिया देते हे व पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
