Rahul Gandhi 2
कार्यकर्त्यांसमोर राहुल गांधी जैशच्या म्होरक्याला म्हणाले ‘मसूद अजहरजी’
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकले आहेत. पुलवामा हल्ल्यावरून भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी मोठी चूक केली आहे.
आज नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यामागचा सुत्रधार जैश-ए-मोहम्मद या दशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा ‘मसूद अजहरजी’ असा आदरार्थी उल्लेख केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षावर टीका करण्याच्या नादात राहुल गांधी स्वत:च अडचणीत अडकले आहेत.
भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये भाजपने म्हटले आहे की, देश के 44 वीर जवानों की शहादत के लिए जिम्मेदार आतंकी संगठन जैश-ए-मोहम्मद के सरगना के लिए राहुल गांधी के मन में इतना सम्मान!
देश के 44 वीर जवानों की शहादत के लिए जिम्मेदार आतंकी संगठन जैश-ए-मोहम्मद के सरगना के लिए राहुल गांधी के मन में इतना सम्मान! #RahulLovesTerrorists pic.twitter.com/I8a9FY60cW
— BJP (@BJP4India) March 11, 2019
