Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पूजन

श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पूजन

सातारा, दि. २२ : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथ पूजन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री  संदिपान भुमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन
राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री  संदिपान भुमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलची माहिती घेतली. याप्रसंगी विखे-पाटील व भुमरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *