अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा
मुंबई: सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आज काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा सोपवला आहे.
सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. सुजय यांनी आपल्याला न सांगताच हा निर्णय घेतल्याचे विखे पाटील यांनी सांगितले होते. मात्र पक्षाने अविश्वास दाखवल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आज विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला.
मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांच्या राजीनाम्याबाबत योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगितले जात आहे.
