Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे फलटण डेमू रेल्वे सेवा आजपासून होणार सुरु

पुणे फलटण डेमू रेल्वे सेवा आजपासून होणार सुरु

पुणे, दि. ३०: पुणे ते फलटण डेमु रेल्वे सेवा आजपासून सुरु होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता दूरदृष्य प्रणाली मार्फत या रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेतेही या समारंभात दूरदृष्य प्रणाली मार्फत सामील होतील. कृषी उत्पादन आणि कंपन्यांमुळे फलटण ते पुणे आणि इतर शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. रेल्वे, सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे.

यामुळे पुणे ते फलटण रेल्वे सेवा नागरिकांना सोयीची ठरणार आहे. फलटण-पुणे अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा उद्या ३१ मार्चपासून सुरू होईल. ही गाडी पुण्याहून सकाळी ५.५० ला सुटेल आणि ९.३० वाजता फलटणला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी फलटणहून संध्याकाळी ६.०० वाजता सुटेल आणि पुण्यात रात्री ९.३० वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी आणि सासवड रोड स्थानकावर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *