Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असलेल्या देशातल्या १० जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातले; पुणे अव्वल स्थानी

सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असलेल्या देशातल्या १० जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातले; पुणे अव्वल स्थानी

पुणे: देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आता पर्यंत २ कोटी ६० लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या कमी झाली होती; मात्र आता ही संख्या पुन्हा वाढते आहे, असं भूषण म्हणाले.

देशात सध्या १ लाख ८९ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वाधिक म्हणजे १ लाख २४० उपचाराधीन रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कालही राज्यात १४ हजार ३१७ नवबाधितांची नोंद झाली. सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असलेल्या देशातल्या १० जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातले असून महाराष्ट्रातली परिस्थिती चिंताजनक असल्याचं आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. चिंतेची बाब म्हणजे यात पुणे अव्वल स्थानी आहे.

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन कारणीभूत नाही; मात्र चाचण्यांचं आणि रुग्ण शोधण्याचं प्रमाण घटल्यानं ही संख्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी वाढती गर्दी आणि कोरोना नियमांकडं दुर्लक्ष याचाही परिणाम झाल्याचं भार्गव म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *