Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘या’ आहेत त्या नवी मुंबईतील १० अनधिकृतरित्या चालवल्या जाणाऱ्या शाळा

शासनमान्य शाळेत प्रवेश घेण्याच्या केल्या सूचना

नवी मुंबई, दि.१२: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांवर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोबत जोडलेल्या यादीतील १० प्राथमिक शाळा शासनाची/नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही.

तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. असे पालिकेतर्फे सूचित करण्यात आले आहे.

या आहेत त्या दहा शाळा

 

ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *