प्रियांका गांधी चोराच्या पत्नी आहेत – उमा भारती
भोपाळ: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वरिष्ठ नेत्या व केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्तीसगडमधील दुर्ग लोकसभा मतदार संघात गेल्या होत्या. यावेळी त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांबाबत भारती म्हणाल्या की, “भारतात लोकशाही आहे. त्यामुळे कोणताही इच्छूक उमेदवार कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढू शकतो.”
यानंतर त्या म्हणाल्या की, “प्रियांका गांधी एका चोराच्या पत्नी आहेत. संपूर्ण हिंदुस्तान त्यांच्याकडे चोर याच नजरेने पाहतील.”
पत्रकारांनी उमा भारती यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, “निवडणूक आयोगाने योगी आणि आजम खान या दोघांना समान दंड सुनावला आहे. परंतु दोघांच्याही अपराधांमध्ये खूप फरक आहे.”
