राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल, प्रख्यात चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे.
भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांच्या नावानं हा पुरस्कार १९६९ मध्ये सुरू करण्यात आला. भारतीय चित्रपटाच्या विकासात उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार सरकारकडून दिला जातो. सुवर्ण कमळ आणि दहा लाख रुपये रोख, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
