Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

निकृष्ट आरटी-पीसीआर किटस् प्रकरणाची चौकशी करण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी

निकृष्ट आरटी-पीसीआर किटस् प्रकरणाची चौकशी करण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी

मुंबई/पुणे: कोरोना चाचणीसाठी जालना आणि पुणे जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचे आरटी-पीसीआर किटस् वापरण्यात आले. राष्ट्रीय विषाणू संस्थेनं तपासणी संच निकृष्ट असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही त्यांची खरेदी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

त्यामुळे या गंभीर प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी काल  केली. १ ऑक्टोबर पासून राज्य सरकारनं आरटी-पीसीआर किटस् ची खरेदी सुरू करताच अडचणी निर्माण होत आहेत. जालना जिल्ह्यातील ज्या डॉक्टरांच्या तत्परतेमुळं निकृष्ट आरटी-पीसीआर असल्याचं उघड झालं त्यांनाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं दरेकरांनी सांगितलं. या गंभीर प्रश्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीनं दखल घ्यावी.

निकृष्ट दर्जाचे किटस् पुरविणाऱ्या कंपनीला कायम स्वरुपी काळया यादीत टाकण्यात यावे. तसेच या किटसला मान्यता देणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालकांवर तसेच न तपासता हया किटस् स्विकारणाऱ्या आरोग्य संचालकांवरही  तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी यावेळी केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *