वाचा प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे
सोलापूर: काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना अनेक वेळा भाजपकडून ऑफर आली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसभवनमध्ये बोलताना केला.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मला व माझ्या मुलीला भाजपने अनेक वेळा काँग्रेससोडून भाजपमध्ये येण्यास गळ घातली होती. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहू, आमच्या रक्तात काँग्रेस आहे, असेही सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले.
भाजप देशामध्ये हुकूमशाही राजवट आणण्याचा प्रयत्न करतंय. सध्याच्या निवडणुकीत भाजप सरकार जातीधर्माचे राजकारण करून लोकांचे मन जिंकून घेत आहे पण यंदाच्या निवडणुकीत लोक भाजपला निवडून देणार नाहीत, असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
