गरजू लोकांच्या बँक खात्यात ९० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, दि. १५: आज देशाच्या ७४वा स्वातंत्र्यदिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधले. आपल्या लांबलचक अशा जवळपास ८६ मिनिटांच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला तर अनेक नव्या घोषणाही केल्या. वाचा
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
● आपण #COVID19 विरुद्धची लढाई नक्की जिंकू,१३० कोटी भारतीयांच्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण हा विजय मिळवू असा मला विश्वास आहे.
● भारताचा स्वातंत्र्यलढा संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा एक दीपस्तंभ ठरला. अगदी विस्तारवादाच्या लाटेतही भारताने स्वतंत्रतेची आकांक्षा कायम ठेवत या स्वातंत्र्यासाठी बलिदानही दिले.
● जगामध्ये भारताचे योगदान वाढणे ही काळाची गरज आहे, यासाठी भारत आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे.
● आता #मेक इन इंडिया सह, आपल्याला #मेक फॉर वर्ल्ड हा मंत्र घेऊन वाटचाल करायाची आहे.
● संपूर्ण जग भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासाकडे पाहात आहे. गेल्या वर्षी थेट परकीय गुंतवणुकीत १८ टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. आपली अर्थव्यवस्था आणि लोकशाही बळकट करण्यामुळे आपल्यावर जगाचा विश्वास वाढला आहे.
● राष्ट्रीय नळजोडणी पायाभूत योजना, देशाच्या संपूर्ण पायाभूत विकासात एक नवा मार्ग उपलब्ध करुन देणारी ठरेल. विविध क्षेत्रात असे ७,००० प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. त्यांचा लाभ सर्वांनाच मिळेल.
● ८० कोटीपेक्षा जास्त भारतीयांना मोफत अन्नधान्य मिळाले, गरजू लोकांच्या बँक खात्यात ९०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली, ज्याची कल्पना काही वर्षांपूर्वी कोणीही केली नसती.
● आज #जल जीवन मिशन ला एक वर्ष पूर्ण होत आहे, आता दरदिवशी एक लाखांपेक्षा जास्त अतिरिक्त घरांना नळाने पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या एका वर्षात दोन कोटी घरांना नळाने पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
