Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पाच अब्ज डॉलर्सचं संरक्षणसामुग्री निर्यातीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट

पाच अब्ज डॉलर्सचं संरक्षणसामुग्री निर्यातीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट

आगामी पाच वर्षात संरक्षणसामुग्रीच्या निर्यातीसाठी केंद्रसरकारनं पाच अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. ते काल लखनौमधे डिफेन्स-एक्सपो 2020 च्या उद्धाटन समारंभात बोलत होते.

निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत, आणि आमच्या सरकारची धोरणं याला अनुकूल आहेत, असं त्यांनी सांगितलं.

गेल्या पाच वर्षात संरक्षण सामग्रीची निर्यात सतरा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं मोदी यांनी सांगितलं.

हे अकरावं द्वैवार्षिक प्रदर्शन आहे. संरक्षण मंत्रालयाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. पुढे ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारनं संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशीला प्राधान्य दिलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *