‘फोन टॅपिंग’ प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीची स्थापना
मुंबई, दि.१२: राज्यातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. याविषयी शुक्रवारी शासन आदेश जारी करण्यात आला. यानुसार वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीत अनधिकृतरित्या ‘फोन टॅपिंग’ करण्यात आले आहेत का? याचा तपास करून विधीमंडळाच्या पुढील अधिवेशनामध्ये त्या विषयीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
या समितीमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आणि विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचा समावेश असणार आहे. तपास पूर्ण करून तीन महिन्यांच्या आत या विषयीचा अहवाल शासनाला सादर करायचा आहे.
