म्युकरमायकोसिस वरील लिपोसोमल अम्फोटेरेसिन बी औषधाचं उत्पादन करू शकणाऱ्या ५ उत्पादकांना तातडीने परवाना जारी
मुंबई, दि.२७: देशात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले लिपोसोमल अम्फोटेरेसिन बी हे इंजक्शन उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. ह्या औषधाचं उत्पादन करू शकणाऱ्या ५ नवीन उत्पादकांना तातडीने परवाना जारी करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनाला याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत, जगभरातून हे इंजक्शन भारतात आणण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. गिलीयाड सायन्सिस ह्या अमेरिकन संस्थेतर्फे आतापर्यंत एक लाख एकवीस हजार मात्रा भारतात पोहोचल्या आहेत, कंपनीतर्फे एकंदर दहा लाख मात्रां देण्यात येणार आहेत.
Source – AIR
