निषेधाचे फलक व तोंडाला काळे मास्क लावत भाजप नेत्यांनी केले ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन
मुंबई: भारतीय जनता पक्षाने आज ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयाबाहेर येत हातात फलक झळकावले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी सर्व नेत्यांनी तोंडालाही काळे मास्क लावले होते.
याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सहपरिवार घराबाहेर येत हातात फलक झळकावत सरकारचा निषेध नोंदवला. राज्यातील भाजपच्या इतर नेत्यांनी, आमदारांनीही आपापल्या घराबाहेर येत निषेधाचे फलक व तोंडावर काळे मास्क लावत ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनात सहभागी नोंदवला.