‘पीएफआय’ च्या देशभरातल्या कार्यकर्त्यांवर एनआयए, एटीएस आणि स्थानिक पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई, दि. २७ : राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA), दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी आज देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात एफआयशी निगडीत विविध ठिकाणी छापे टाकले. राज्यात औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, पुणे, मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणाहून ४० हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. यातले १३ जण औरंगाबादमधले तर ७ जणांना मराठवाड्याच्या विविध भागातले आहेत. मुंब्रा इथून चौघांना, मालेगावातून दोघांना, सोलापूरातून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
दिल्लीत निजामुद्दीन, शाहीन बाग सह इतर भागात मारलेल्या छाप्यात चार जणांना अटक झाली. कर्नाटकातही आज पीएफआयच्या जिल्हा स्तरीय कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यात ४० जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना अटक झाली. पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केरळ आणि तामिळनाडूमध्ये केलेल्या हिंसक कारवायांच्या बातम्या आल्यानंतर ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. आसामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये टाकलेल्या छाप्यात पीएफआयच्या २५ सदस्यांना अटक झाली आहे.
Source – AIR
