छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शूद्र वर्णात झाला होता; मॉडेल पायल रोहतागी हिचे वादग्रस्त वक्तव्य
सध्या महापुरुषांबद्दल काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करा आणि प्रसिद्धी झोतात राहा असा उद्योग काही सेलेब्रिटी करताना दिसत आहेत. त्यात सध्या अग्रगण्य नाव घेता येईल ते मॉडेल, अभिनेत्री पायल रोहतागी हिचे. यावेळी तिने थेट अखिल भारताचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. छत्रपती महाराजांचा जन्म छुद्रवर्णीय शेतकरी कुटुंबात झाल्याचे तिने म्हटले आहे. पायलच्या या वक्तव्यावर देशभरातून टीकेचा भडिमार होत आहे.
ट्विटर व इन्स्टाग्राम अशा दोन्ही ठिकाणी केलेल्या पोस्ट मध्ये तिने म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज हे एका शेतकरी कुटुंबात शुद्रवर्णीय म्हणून जन्माला आले. धार्मिक विधी व पुर्नलग्नानंतर त्यांना क्षत्रिय करण्यात आलं ज्यामुळे त्यांचा राज्याभिषेक सोहळा करता आला. याचा अर्थ एका वर्णाची लोकं दुसऱ्या वर्णात कौशल्य प्राप्ती करून स्थानांतरित होऊ शकतात….जातीवाद नाही?”
https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1134834382273994752?s=19
इन्स्टाग्राम वर तर तिने याच पोस्ट चा शेवट अजून एक वादग्रस्त ओळ टाकून केला आहे. “मराठ्यांना महाराष्ट्रात आरक्षण का दिलं जात आहे?” असा सवाल तिने केला आहे. इन्स्टाग्राम वरील पोस्ट सोबत तिने आपला पती संग्राम सिंग सोबतचा फोटोही शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/ByMovg7gTC7/?igshid=r00s0wszwgqz
सध्या अशी सवंग प्रसिद्धी मिळवून असे हे सेलिब्रिटी समाजामध्ये दुही पसरवण्याचे कामं करत आहेत असेच म्हणावे लागेल. कलाक्षेत्रात विशेष ठसा न उमटवता आल्यामुळे मग अशी वादग्रस्त वक्तव्य करून सतत प्रसिद्धी झोतात राहता येऊ शकते हे नेमकं पायल रोहतागी सारख्या मॉडेल ने ताडलं आहे. शिवाय वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सखोल अभ्यास करावा लागत नाही हे विशेष.
