पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ
मुंबई, दि. २२ : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी येत्या ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुंबईतल्या विशेष पीएमएलए न्यायालयाने आज हा निर्णय दिला. ३१ जुलै रोजी राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली त्यानंतर ८ ऑगस्टपर्यत राऊत संचालनालयाच्या कोठडीत होते. नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
