सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पार्थ पवार यांचे वादळी ट्विट
मुंबई, दि.१९: आज सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यू प्रकरणी तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआय कडे देण्याचा थेट आदेश दिला. ज्यानंतर देशभरातलं विशेषतः महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ज्यावर त्यांचे शरद पवारांनी कान टोचले होते. आजच्या निकालानंतर पार्थ यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट करत राजकीय वादळच निर्माण केले आहे.
पार्थ यांच्या ट्विटवर भाजपच्या अनेक नेत्यांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
