पार्थ पवार यांचे नाव अद्याप तरी गुलदस्त्यात
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली. या यादीत मावळमधून पार्थ अजित पवार यांच्या नावाची घोषणा होईल, अशी शक्यता सर्वांना होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत तरी त्यांचे नाव आलेले नाही. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर सस्पेन्स अजूनही कायम आहे.
हातकणंगलेच्या जागेवर राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने माढा, बीड, अहमदनगर, गोंदिया, मावळ येथील उमेदवारांची नाव अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवली आहे.
