परभणीत बाटलीबंद पाण्याचं उत्पादन घेणाऱ्या अग्रवाल इंडस्ट्रीज कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा छापा
परभणी: परभणी शहरातल्या औद्योगिक वसाहतीत बाटलीबंद पाण्याचं उत्पादन घेणाऱ्या अग्रवाल इंडस्ट्रीज या कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (दि. १) रोजी छापा टाकला.
या छाप्यात चार लाख रुपये किमतीचा साठाही जप्त केला आहे. ही कंपनी विनापरवाना व्यवसाय करत असल्याचं आढळून आल्यानं हा छापा घ्यातल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रशासनानं कंपनीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत.
(सौजन्य – AIR)
