पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार
मुंबई, दि.२४: गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केल्यामुळं चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.
पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केलेल्या FIR मधे सिंग यांनी उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षणासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांनी शुक्रवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत ऑनलाईन सुनावणी घेतली.
आज सुनावणी पुढे सुरु केल्यावर परमबीर सिंग यांना अटक करु नये असे निर्देश देत न्यायालयानं नियमित पीठासमोर सुनावणीसाठी ९ जून ही तारीख दिली.
