परमबीर सिंग यांना तूर्तास दिलासा; २० मे पर्यंत अटकेपासून सुटका
मुंबई, दि.१४: भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे प्रथम माहिती अहवाल(FIR) दाखल झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २० मे पर्यंत अटक करण्यात येणार नसल्याची हमी, राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
अकोला इथल्या पोलीस निरीक्षकाने हा आरोप केला असून, त्याविरोधात परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर दाखल करण्यासाठी राज्य सरकारला एका आठवड्याची मुदत द्यावी, तोपर्यंत अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई होणार नाही, असे राज्य सरकारच्या वकीलांनी सांगितले.
