Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पप्पू पेजर कायमचा बंद झाला; ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं मुंबईत निधन

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं मुंबईत निधन

मुंबई, दि. ९: ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज सकाळी ह्रदयविकारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमधे काम केलं आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. चित्रपट कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्यांनी रंगभूमीवरही अभिनय केला. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तसंच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. मिस्टर इंडिया मधील कॅलेंडर व दिवाना मस्ताना मधील पप्पू पेजर या त्यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखा होत्या.

जाने भी दो यारो, मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना आणि उडता पंजाब हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. विनोदी ढंगाचा अभिनय ही त्यांची खासीयत. रूप की रानी चोरों का राजा यासह अनेक चित्रपटांचं त्यांनी यशस्वी दिग्दर्शनही केलं. १९९० मधे त्यांना राम लखन चित्रपटासाठी तर १९९७ मधे साजन चले ससुरार या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

Source – एआयआर

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *