Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल येथील करंजाडे येथे मोफत नेत्र तपासणीला उत्तम प्रतिसाद

करंजाडे, पनवेल येथे मोफत नेत्र तपासणीला उत्तम प्रतिसाद

पनवेल, दि.८(विठ्ठल ममताबादे): डॉ. विक्रम पाटील, डॉ. सुवर्णा पाटील व लायन्स क्लब पनवेल रॉयल प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून ओम साई दत्त प्रसाद क्लिनिक, सेक्टर ४, करंजाडे, नवीन पनवेल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला. सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती शिबिरात डॉ. विक्रम पाटील यांनी दिली. यावेळी रामेश्वर आंग्रे-सरपंच करंजाडे, ज्योति देशमाने-रिजनल मुख्य लायन्स क्लब, सई पवार-महिला विभागप्रमुख शिवसेना पं.स. करंजाडे, चंद्रकांत गुजर-अ. करंजाडे फ्लॅट ओनर्स, प्रतीक्षा लांगी-उपविभागप्रमुख शिवसेना पं.स. करंजाडे, गौरव गायकवाड-शहरप्रमुख शिवसेना करंजाडे, अंजली मानापुरे-शहर प्रमुख महिला करंजाडे, मंगेश बोरकर, हेमा गोतमारे, अंबादास यादव-अध्यक्ष लायन क्लब, अमित गोखले, डॉ. अमोल बामणे, रविकिरण घोडके व करंजाडे डॉक्टर्स असोसिशन व जेष्ठ नागरिक संघटना करंजाडे व करंजाडेतील नागरिक उपस्थित होते.

सदर शिबिराचे सुत्रसंचालन डॉ. विक्रम पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व डॉ. विक्रम पाटील, डॉ. सुवर्णा पाटील, लायन्स क्लब पनवेल रॉयल प्राईड यांनी आयोजित केलेल्या शिबिराचे कौतुक करत नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *