पनवेल मनपा हद्दीतील कामोठे-खारघर मधील रुग्ण संख्या वाढतीच; आज नव्या ६ रुग्णांची नोंद
पनवेल: पनवेल महानगरपालीका हद्दीत आज कोरोनाबाधित एकूण नव्या ६ रुग्णांची भर पडली. यात ३ रुग्ण कामोठे तर ३ रुग्ण खारघर विभागातील आहेत. सर्वच रुग्णांना त्यांच्या निकटच्या लोकांकडून अथवा कार्यालयातील कोरोनाबाधितांकडून संसर्ग झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
आजच्या आकडेवारीला धरून पनवेल महापालिका विभागात एकूण ७० रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत ४१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले आहेत तर २ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

