पनवेल तालुक्यातील ‘ही’ ठिकाणं जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित
पनवेल : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ज्या क्षेत्रांत कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत ती ठिकाणं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.
वाचा या क्षेत्रांचा संपूर्ण तपशील
१) उमरोली ता. पनवेल येथील ग्रीन रिव्हरसाईड को.ऑ.हौ.सो.४ ए विंग, ही इमारत
२) उसर्ली खुर्द ता. पनवेल येथील बालाजी आर्केड फेज १, ई व एफ विंग
३) करंजाडे नोड ता.पनवेल येथील चंद्रदर्शन पॅराडाईज, प्लॉट नं.38, सेक्टर-4 ही इमारत
४) विचुंबे ता.पनवेल येथील ज्ञानेश्वर माऊली को.ऑ.हौ.सो.,सी विंग व डी विंग ही इमारत
५) उसर्ली खुर्द ता.पनवेल येथील निळकंठ विश्व फेज २ को.ऑ.हौ.सो. ही इमारत
करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस वरील सर्व ठिकाणं Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
