पनवेल तालुक्यातील ‘ही’ ५ क्षेत्र आजपासून पुढील २८ दिवसांसाठी कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित
आज दिनांक ५ मे २०२० रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशाने पनवेल तालुक्यातील पुढील विभाग २८ दिवसांसाठी कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
१) मौजे पालीदेवद (सुकापूर) येथील साक्षीपार्क-२, बिल्डिंग नं. ५ (सबंध इमारत)
२) (उलवे) प्लॉट १९७, सेक्टर ३, येथील कृष्ण कुंज ही इमारत
३) प्लॉट क्र.बी ११, सेक्टर-८, उलवे ता.पनवेल येथील रिध्दी-सिध्दी एक्झो बिल्डींग फक्त ही इमारत
४) साई निल दर्शन को.ऑ.हौ.सो., विचुंबे, ता.पनवेल ही संपूर्ण इमारत
५) उलवे, सेक्टर ८, येथील डेल्टा टॉवर, (अे विंग) ही इमारत
वरील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
