Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल ‘मनपा’तील आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची दिवाळी ‘बोनस’ विनाच; आयुक्त देशमुख याकडे लक्ष देणार का?

कंत्राटदार ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कडून पुनः एकदा कर्मचार्‍यांची पिळवणूक

पनवेल, दि. २४ : पनवेल महानगरपालिकेला मनुष्यबळ पुरवठा   करणार्‍या   ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर   प्रायव्हेट लिमिटेड’   या  कंत्राटदार   कंपनीने  महापालिकेतील आपल्या    विविध  विभागातील   कर्मचार्‍यांना  दिवाळी बोनस म्हणून   एक महिन्याचे  वेतन  देणार  असल्याचे जाहीर केले   आहे. यात  आस्थापना विभागातील २२७, फायरमान   विभागातील  ४२  तर   पाणीपुरवठा विभागातील  १०४  अशा  अंदाजे  ३७३  कर्मचार्‍यांना दिवाळी   बोनस चे   वाटप  करण्यात    येणार आहे.  किंबहुना आतापर्यंत ते झालेही   असेल. एका  बाजूला या कर्मचार्‍यांना   बोनस मिळत   असून दुसर्‍या  बाजूला ‘गुरुजी’ ने पनवेल महानगरपालिकेच्या  आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आपल्याच  कर्मचार्‍यांना वार्‍यावर  सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोविड  सारख्या  जीवघेण्या जागतिक  महामारीच्या काळात  आपल्या   जिवाची   पर्वा न करता  अगदी  तुटपुंज्या वेतनावर काम करणार्‍या या आरोग्य सेवेतील  कर्मचार्‍यांची गरज  संपल्यावर त्यांना सापत्न  वागणूक  दिली जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. या कर्मचार्‍यांना दिल्या   जाणार्‍या   मूलभूत  सोई   सुविधांबाबत न  बोललेलेच बरे.  कोविड   काळातही या   कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या विम्याचा लाभ योग्यरीत्या देण्यात आला नव्हता. तरीही  गरजेपोटी या कर्मचार्‍यांनी पडती बाजू सांभाळत आरोग्य सेवेतील कामात स्वतःला  झोकून दिले होते. या   कर्मचार्‍यांना  आशा  होती की तत्कालीन सरकारने  जाहीर  केल्याप्रमाणे   आपल्याला पालिकेच्या सेवेत  सामावून  घेतले जाईल. परंतू,  याच्या विरुद्ध  या त्यागाचे  फलित म्हणून  आरोग्य सेवेतील   कर्मचार्‍यांना कोविड ची लाट   गेल्यागेल्या  चक्क अचानकपणे  नारळ देण्यात आला.

आताही   गुरुजी   इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या  कंत्राटदाराने आरोग्य  सेवेतील  कर्मचार्‍यांना   दिवाळी  बोनस न देत   त्यांच्या   तोंडाला   पाने पुसली आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांबाबत बोलायचे झाले तर त्यांच्या कार्यक्षमतेची मीमांसा करण्याची आता वेळ आली आहे. मुळात या प्रकरणी मानवतेचा दृष्टीकोन  समोर ठेवून   पनवेल महानगरपालिकेचे   आयुक्त गणेश देशमुख यांनी   स्वतःहून  हस्तक्षेप   करत कंत्राटदारास कर्मचार्‍यांना  दिवाळी बोनस अदा करण्याचे निर्देश देणे अपेक्षित होते. पण अद्याप तसे झालेले पाहायला मिळत  नाही. दर वेळी जर तक्रार आल्यावरच कार्यवाही  होणार असेल  तर मग   सुप्रशासनाचा  टेंभा  पनवेल महानगरपालिकेने न मिरविलेलाच बरा. या सबंध प्रकरणी महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने मनुष्यबळ  कंत्राटदार  ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ ला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जो अद्याप होऊ शकलेला नाही. सोबतच दिवाळी निमित्त पनवेल  महानगरपालिका कार्यालयास   सुट्टी  असल्यामुळे   आयुक्त गणेश देशमुख यांची प्रतिक्रियाही अद्याप जाणता  आलेली नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *