पाकिस्तानवर महागाईचा सर्जिकल स्ट्राईक; कांदा, दूधाचे दर भिडले आसमंताला
पाकिस्तान: एका बाजूला रमजान चा महिना सुरू झाला आहे तर दुसरीकडे पाकिस्तान मध्ये वाढलेल्या किमतींनी लोकांच्या तोंडाला फेस आला आहे. पाकिस्तानात बऱ्याच काळापासून पैश्याच्या अवमूल्यनाचा दर चढाच असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाही, खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे देशभर नाराजी दिसत आहे. आता ही नाराजी पाकिस्तानच्या संसदेपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे विरोधीपक्षांनी सभात्यागही केला. खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या महागाई व्यतिरिक्त तेल आणि गॅस च्या किमतीतही ९ रुपयांची वाढ केली आहे.
वाढलेल्या किमतींवर एक नजर
पाकिस्तानात या वेळी (meat)मांस, तूप, खाद्य तेल, पीठ, कांदा, चिकन आणि फळांसोबत अन्य वस्तूंच्या किमतीही आकाशाला गवसणी घालत आहेत. मटणाचे दर ५० तर चिकनचे दार ८०-१०० रुपयांनी वाढले आहेत. त्याचवेळी ब्रेड च्या दरात ४ ते १० रुपयांनीची वाढ दिसून आली आहे. या व्यतिरिक्त साखर १५ रुपये, कांदा ३०-४० रुपये, खजूर १५०-३०० रुपये, खरबूज जवळपास २० रुपयांनी महाग झाले आहेत. सर्वांत कहर म्हणजे तिथे दुधाचे दर चक्क १८० रुपयांवर गेले आहेत. आता प्रश्न हा पडतो की पाकिस्तानच्या भारताविरुद्ध युद्धाच्या वल्गना कोणत्या आधारावर होत्या. सध्या पाकिस्तानने त्यांच्या देशावर महागाईने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक शी सामना करावी व आपल्या लोकांना सांभाळावे असे भारतीयांचे मत आहे.
अधिक बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेज ला LIKE करा
