Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांना मिळाले पद्म पुरस्कार

महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांना मिळाले पद्म पुरस्कार

पद्म पुरस्कार काल जाहीर झाले, यामध्ये सात जणांना पद्मविभुषण, १० जणांना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले.

पद्मविभुषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे, तसेच दिवंगत गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचा समावेश आहे.

लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई, भाजपचे दिवंगत नेते केशुभाई पटेल, उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांचा पद्मभूषण प्राप्त मान्यवरांमध्ये समावेश आहे.

पद्मश्री सन्मान प्राप्त १०२ जणांमध्ये महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, गोव्याच्या माजी राज्यपाल दिवंगत मृदुला सिन्हा, लिज्जत पापडच्या प्रणेत्या जसवंतीबेन पोपट, शिवकालिन चित्रकथी कलेचे प्रसारक परशुराम गंगावणे, वाशिम इथले साहित्यिक नामदेव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, यांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *