३ दिवसांपेक्षा जास्त काळ कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा
नाशिक, दि. १०: केंद्र सरकारने कांद्यावर घातलेली निर्यात बंदी उठवण्याबाबत केंद्राकडून लवकरच फेरविचार होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. कांदा निर्यातबंदी च्या निषेधात नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान टाळतानाच सामान्य नागरिकांना कांदा रास्त दरात मिळावा, यादृष्टीनं मागणी आणि पुरवठा बघून यासंदर्भात निर्णय घेतला जात असतो, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, तीन दिवस लिलाव बंद ठेवला तर, संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा सहकार उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी दिला आहे.
