Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

२०२० सालातील प्रस्तावित रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया अखेर रद्द

२०२० सालातील प्रस्तावित रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया अखेर रद्द

मुंबई दि. ११: रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२० नुसार दि. १३ मार्च २०२० अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील वरिष्ठ तांत्रिक सहायक-२ व प्रयोगशाळा परिचर-१ सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याकरीता दि. १३ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया कोविड २०१९ व प्रशासकीय कारणामुळे राबविण्यात आली नाही. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील १२४ रिक्त असलेली पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. या रिक्त पदांमध्ये वरील जाहिराती मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाची पदे समाविष्ठ असल्याने जाहिरात क्रमांक ०१/२०२० दि. १३ मार्च २०२० अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे असे नागपूर येथील रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *