Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“तान्हाजी” चे दिग्दर्शक ओम राऊत यांना जितेंद्र आव्हाड म्हणाले ” …..याला धमकी समजली तरी चालेल”

“तान्हाजी” चे दिग्दर्शक ओम राऊत यांना जितेंद्र आव्हाड म्हणाले ” …..याला धमकी समजली तरी चालेल”

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख सरदारांपैकी एक असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित “तान्हाजी द अनसंग वॉरिअर” या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. यानंतर काल संभाजी ब्रिगेड ने काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला होता. तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत थेट या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना या चित्रपटातील काही दृश्यांवरून धमकीवजा इशारा दिला. ते म्हणाले की, “ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.
याला धमकी समजली तरी चालेल.” पण यानंतर जितेंद्र आव्हाड हे ट्रॉलर्स कडून ट्रोल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, अभिनेते शरद केळकर, काजोल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *