Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अभिमानास्पद! भारतीय नौदलाचा धावपटू एम. पी. जबीर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र

भारतीय नौदलाचा धावपटू एम. पी. जबीर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र

पतियाळा इथं नुकत्याच झालेल्या अॅथलेटिक्स अजिंक्य स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारा भारतीय नौदलाचा धावपटू एम. पी. जबीर हा टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. जागतिक क्रमवारी कोट्यातून त्याला प्रवेश मिळाला आहे.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवलेल्या ४० जणांच्या यादीत जबीर ३४ वा आहे. जबीरला संधी मिळाल्यानं, ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सहभागी होणारा तो भारताचा पहिलाच पुरुष खेळाडू ठरणार आहे. याआधी भारताची धावपटू पी. टी. उषा हिनं अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे, पी. टी. उषा आणि जबीर हे दोघेही केरळचेच आहेत.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *