ओडिशातील वादळग्रस्त क्षेत्रातील जनजीवन पूर्ववत करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न
ओडिशा, दि.२७: यास चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या क्षेत्रांना पुन्हा लवकर सामान्य परिस्थितीत आणण्याचा आदेश ओडिशा सरकारने दिला आहे. काल राजधानी भुवनेश्वरमध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चक्रीवादळाने ओडिशातील उत्तर भागात केलेल्या नुकसानाचा आढावा घेतला. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात ३४ तासांत वीजपुरवठा आणि रस्ते मार्ग पूर्ववत करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
भद्रक आणि बालेश्वरसारख्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील बुडालेल्या १२८ गावातील लोकांना मदतसामुग्री देण्याची घोषणाही केली आहे. दरम्यान भुवनेश्वरहून काल संध्याकाळपासून विमान उड्डाण सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारी तीन विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मुंबईहून कोलकाता आणि भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानांचा यात समावेश आहे तर तीन विमानांचं आगमनही रद्द करण्यात आलं आहे.
