लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुंबई, दि. २१: ओबीसी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी बैठक बोलावली असून, यात जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथले पाच सदस्यांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. यावेळी उपोषणकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Source – AIR
