राष्ट्रीय शेअर बाजारातल्या घोटाळ्या प्रकरणी आनंद सुब्रमण्यम यांना अटक
मुंबई: शेअर बाजार घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय शेअरबाजाराचे माजी समुह संचलन अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना सीबीआयनं काल रात्री त्यांच्या चेन्नईमधल्या घरी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयात नेलं जात आहे. आनंद सुब्रमण्यम राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार होते.
या घोटाळा प्रकरणी न्यायालयानं आनंद सुब्रमण्यम, चित्रा रामकृष्ण आणि रवि नारायण यांना फरार घोषित केलं होतं. सीबीआय या प्रकरणी अधिक तपास करत आहे. यापूर्वी गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना सेबीने ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
