Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकअदालतीमुळे पाणी बिलापोटीची थकीत १ कोटीहून अधिक रक्कम नवी मुंबई महापालिका तिजोरीत जमा

लोकअदालतीमुळे पाणी बिलापोटीची थकीत १ कोटीहून अधिक रक्कम नवी मुंबई महापालिका तिजोरीत जमा

नवी मुंबई, दि. १७: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध करांच्या थकबाकीबाबत देशभरात लोकअदालतींचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने लोकसेवा विधी प्राधिकरण, ठाणे यांच्या माध्यमातून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, बेलापूर येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत पहिल्या टप्यात पाणी पुरवठा देयकांची 1 लक्ष व त्यावरील अधिकची थकीत रक्कम असलेल्या 504 पाणी देयक थकबाकीदार ग्राहकांना न्यायालयामार्फत नोटीस जारी करण्यात आल्या. त्यांच्याकडून 39 कोटी 2 लाख इतकी पाणी देयकाची थकीत रक्क्म येणे बाकी होते.
त्याचप्रमाणे 30 एप्रिल 2023 रोजीच्या दुस-या लोक अदालतीकरिता 50 हजार ते 1 लक्ष पर्यंत थकीत रक्कम असणाया 701 ग्राहकांना न्यायालयामार्फत नोटीस जारी करण्यात आल्या. त्यांच्याकडून 5 कोटी इतकी थकीत पाणी देयक रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस मिळणे बाकी होते.
लोकअदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांनी थकीत पाणी बिलाची रक्कम भरावी हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवतानाच थकबाकीदार पाणी देयक धारकांना दिलासा मिळावा यादृष्टीने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अशा ग्राहकांना दिलासा देत त्यांच्या थकीत पाणी देयकांमधील थकीत विलंबशुल्क तसेच दंडात्मक रक्कमेवर 25 टक्के सूट दिली आहे.
अशा रितीने 50 हजार व त्याहून अधिक थकीत पाणी देयक रक्कम असणा-या ग्राहकांनी लोक अदालतीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1 कोटी 2 लाखाहून अधिक रक्कम थकीत पाणी बिलापोटी नवी मुंबई महानगरपालिकेकडे भरणा केलेली आहे. अशाप्रकारे थकीत पाणी बिल भरण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या 25 टक्के सवलतीचा लाभ घेऊन नागरिक मोठया प्रमाणावर पाणी देयकाच्या थकीत रक्कमेचा भरणा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या पुढील लोकअदालत 9 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्याचे नियोजन असून नागरिकांनी त्यापूर्वीच थकीत पाणी देयक रक्कमेच्या विलंबशुल्क व दंडात्मक रक्कमेवर मिळणा-या 25 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा व रक्कमेचा त्वरित भरणा करावा आणि शहर विकासात आपले अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *