बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’तील नितीशकुमार यांच्या जदयु ला मागे टाकत भाजपची घोडदौड
बिहार: काल सकाळी सुरू झालेली बिहार निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पहाटे पर्यंत चालू होती. यात अखेर जदयु आणि भाजप यांच्या राष्ट्रीय संयुक्त आघाडीने(एनडीए) ने १२५ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले. नितीश कुमार यांची जदयु ४३ जागांवर विजयी झाली तर भारतीय जनता पक्षाने ७४ जागांवर विजय संपादित केला. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या महागठबंधन ने ११० जागांवर विजय संपादित केला. यात तेजस्वी यांच्या राजद ने ७५ जागी विजय संपादित केला तर काँग्रेस ला ८ जागांवर समाधान मानावे लागले. याच वेळी भाकप ने १२ जागा मिळवत आश्चर्याचा धक्का दिला.
भाजप निवडणुकीपूर्वी जाहीर केल्या प्रमाणे नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देते की आयत्यावेळी मुख्यमंत्रीपदावर दावा करते हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.
