Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”- नितेश राणे

“अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”- नितेश राणे

स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार नितेश राणे यांनी आज दुपारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरीत्र येणार असून अब आएगा मजा, सबका हिसाब होगा. या ट्विट नंतर नारायण राणे आत्मचरीत्रात काय लिहणार याची उत्सुकता सर्वांना निर्माण झाली आहे.

नारायण राणे आपल्या आत्मचरीत्रात नेमका कोणाचा उल्लेख करणार आहे, कोणावर टीका करणार आहेत. शिवसेना भाजप बदल ते आत्मचरीत्रात काय लिहिणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. नारायण राणे लवकरच अनेक मोठ्या नेत्यांची पोलखोल करतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

नारायण राणे यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ६ महिने काम पाहिले. इ.स. २००५ साली त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली. नारायण राणे यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरले असून सध्या ते राज्यसभेत खासदार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *