पेंग्विनचे लाड करण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा – नितेश राणे
‘पेंग्विनचे अधिक लाड करत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली महापालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही ?’, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला केला आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील पादचारी पूल कोसल्यानंतर आता पुन्हा तोच आरोप-प्रत्यारोपाचा जुना खेळ चालू होईल.
मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे पण त्यांना लोकांच्या आयुष्याची काही किंमत नाही’, अशी खंतही नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे.
