अर्थमंत्री म्हणतात मंदी नाही, फक्त विकास दरात घट झाली !
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाच्या अर्थस्थितीबाबत आपलं मत मांडलं. राज्यसभेत बोलताना त्या म्हणाल्या की आर्थिक विकास दरात घट तर झालेली आहे परंतु मंदी अजिबात नाहीये.
त्या म्हणाल्या की अर्थव्यवस्थेत थोडी सुस्ती आहे पण मंदी काधिच नव्हती. पण परिस्थिती निर्मला सीतारामन यांच्या मताच्या विरुद्ध आहे. आर्थिक विकास दर साडेसहा वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. अर्थव्यवस्थेशी निगडित जवळपास सर्व आकड्यांची स्थिती दयनीय आहे.
